कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी करमाळ्यात बहुजन संघर्ष सेनेचे आंदोलन

केम(संजय जाधव) : बहुजन संघर्ष सेनेच्या मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करमाळ्यात शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कर्जमाफीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे

या मोर्चा विषयी अधिक माहिती देताना बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजभाऊ कदम यांनी सांगितले की या मोर्चाद्वारे विविध मागण्या मांडण्यात येणाऱ आहेत. ज्यामध्ये –
- शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा.
- केळी रोपे कंपनीच्या किमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट दराने विकणाऱ्या एजंटांवर कारवाई करून शेतकऱ्यांना कंपनीच्या किमतीतच रोपे मिळावीत.
- पात्र केशरी रेशनकार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून धान्य उपलब्ध करून द्यावे.
- रेशनकार्डातील नाव वाढवणे-कपात यासंदर्भातील अर्ज एक वर्षापासून प्रलंबित आहेत, ती कामे तातडीने निकाली काढावीत.
- संजय गांधी निराधार योजनेचे सहा महिन्यांपासून थकीत असलेले पैसे लाभार्थ्यांना तातडीने द्यावेत.
- नव्याने मंजूर झालेल्या प्रकरणांना देखील लवकरात लवकर निधी मिळावा.

हा मोर्चा मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, करमाळा येथून सुरू होणार आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.



