करमाळा येथे मुस्लिम समाजाच्या मागण्यांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन -

करमाळा येथे मुस्लिम समाजाच्या मागण्यांबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन

0

करमाळा (दि. १५) : करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील यांना सकल मुस्लिम समाज करमाळा व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे मुस्लिम समाजाच्या विविध समस्या व मागण्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी सक्रिय लक्ष देण्याची विनंती करण्यात आली.

दिलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या  केल्या आहेत :
🔹 दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देणे:
तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान (दफनभूमी) उपलब्ध नाही. यासाठी आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषद सीईओ, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेऊन ग्रामपंचायत अथवा गायरान जमिनीतून ५ ते १० गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी.

🔹 ईदगाह मैदान व कब्रस्तानचे सुशोभीकरण:
जिथे कब्रस्तान व ईदगाह मैदान आहे, त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड व सौंदर्यीकरणासाठी जिल्हा नियोजन व अल्पसंख्याक विभागातून निधी मंजूर करण्यात यावा.

🔹 अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची गरज:
मदरसा फैजुल कुराण येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

यासह मुस्लिम समाजाच्या इतर विविध सामाजिक व शैक्षणिक मागण्यांबाबतही सकारात्मक चर्चा झाली.

या वेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी समाजातील सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेत संपूर्ण सहकार्य व योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

निवेदन देतेवेळी सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर भाई सय्यद, संस्थापक अध्यक्ष समीर शेख, रोहित पवार फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, जमियत उलेमा ए हिंद तालुका अध्यक्ष मौलाना मोहसीन, आयशा मस्जिदचे मुफ्ती अबू रेहान, तसेच अलीम खान, उस्मान सय्यद, सलीम माधारी, दस्तगीर सय्यद, शाहिद बेग, समीर सय्यद, कयूम मदारी, मुबारक सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, इकबाल शेख, इम्तियाज पठाण, जहाँगीर बेग, जावेद सय्यद, अरबाज बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, समीर बागवान, आयुब शेख, आरिफ खान, सोहेल पठाण, मिनाज जहागिरदार, सुपरान शेख, अफजल शेख, मोहसीन शेख यांसह अनेक मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!