पांगरे शाळा नियोजन समितीवर श्री. शेळके यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.28: पांगरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नियोजन समितीवर महेश शेळके यांची अध्यक्षपदी तर दिपक पारेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
पांगरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत , शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापन समितीची निवडणूक पार पडलीय. यावेळी पालक संघाने ही निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले. त्यानुसार अध्यक्ष म्हणून महेश शेळके तर उपाध्यक्ष पदी दिपक पारेकर यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी मुख्याध्यापक जाधव तसेच घोगरे सर, शिंदे सर ,आडे सर, शालेय शिक्षणसमितीचे माजी अध्यक्ष श्री ज्योतीराम गाडे पाटील, पांगरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईचेअरमन चेअरमन पै. बाळासाहेब गुटाळ, पांगरे ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच श्री गणेश वडणे ग्रामपंचायत सदस्य पै.महेश टेकाळे युवा उद्योजक श्री अरुण शेंडगे, सुशांत वडणे,प्रमोद सोनवणे, नागेश पिसाळ,दिपक पारेकर, संतोष गुटाळ,सौ.अलका कुलकर्णी ,शब्बाना आतार,उमा सोनवणे इत्यादी मान्यवरांनी या दोघांचे अभिनंदन केले आहे.