नेहरू विद्यालयात श्रीमती बरडे यांचा भावपूर्ण निरोप सोहळा संपन्न

करमाळा(दि.२० जुलै): रावगाव येथील पंडीत जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या शिक्षकेत्तर कर्मचारी श्रीमती छाया ताई बरडे यांचा सेवा निवृत्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. वास्तविक त्यांच्या निवृत्तीची तारीख ३१ मे २०२५ होती. परंतु त्यावेळी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने काल शनिवारी (दि. १९ जुलै) शाळेतील शिक्षक, शिक्षीका आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत स्नेहभाव पुर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शाळेचे मुख्याध्यापक विजय कोळेकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते सेवा निवृत्त कर्मचारी छायाताई बरडे यांचा यथोचित सत्कार आणि गौरव करुन त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी रावगावचे सरपंच श्री संदीप शेळके, प्रमुख पाहुणे श्री गोवर्धन करगळ, श्री भाऊसाहेब करगळ, श्री विलास बापू बरडे, श्री दादासाहेब जाधव, श्री नानासाहेब जाधव, श्री दासबापू बरडे यांच्यासह गावातील सर्व सन्मानीय आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांपैकी अशोक बरडे (मुख्याध्यापक, जि.प. शाळा धगटवाडी), माधव फुंदे (मुख्याध्यापक, धनगरवस्ती शाळा), बाबासाहेब पाटील (माजी मुख्याध्यापक रावगाव), दादासाहेब जाधव (माजी सरपंच, रावगाव), प्रशांत शिंदे (प्रगतशील बागायतदार), भास्कर पवार (सचिव, राजीव गांधी वाचनालय), श्री. विलास (बापू) बरडे (माजी सरपंच), गोरे सर (माजी मुख्याध्यापक रावगाव), आप्पासाहेब सारंगकर (राजुरी) व कोळेकर सर (मुख्याध्यापक रावगाव) यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग यांनी संयोजन केले तसेच सुत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा बरडे व कु. श्रावणी वारे यांनी केले.



