अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्ताने सौ.बिनवडे व सौ. राख यांचा वंजारवाडीत सन्मान

करमाळा : करमाळा तालुक्यातील वंजारवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नारीशक्ती सन्मान पुरस्कार शोभा रावसाहेब बिनवडे व कल्पना गणेश राख यांना देण्यात आला. हा सन्मान ग्रामपंचायत सरपंच प्रतीक्षा बिनवडे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुदामती रत्नाकर केकान यांच्या हस्ते करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी वंजारवाडी मधील मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते .



