सौ मीराताई बागल यांचे निधन

करमाळा: मांगी येथील रहिवाशी असलेले व पुणे येथील जिजामाता विद्यालयाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधीक्षक प्रतापराव नारायण बागल यांच्या पत्नी सौ मीरा प्रतापराव बागल( वय 59 )यांचे अल्प आजाराने नुकतेच निधन झाले आहे त्यांच्यामागे पती, दोन मुले, सुना,नातवंडे तसेच दीर,जावा,पुतणे असा परिवार आहे.
सौ.मीराताई या अतिशय समंजस व कष्टाळू होत्या,त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार देऊन अभियंता बनवलेले आहे. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. त्यातच त्यांचं पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. मांगी येथे 5 जुलै ला त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. येत्या रविवारी 13 जुलैला सकाळी साडेआठ वाजता संगोबा येथील सीना नदीकाठी दशक्रिया विधी चा कार्यक्रम होणार आहे.