पंतप्रधान सुक्ष्म अन्न योजनेतून सौ. ओहोळ यांना मिळाला रोजगाराचा आधार
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – पेपरमधून पंतप्रधान सूक्ष्म अन्न योजनेची माहिती मिळाली असता, करमाळा येथील उमेद अभियानाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ कृषी विज्ञान केंद्र येथे ट्रेनिंग घेतले, त्या ट्रेनिंगचा आम्हाला खूप मोलाच्या असं सहकार्य लाभले, याच ट्रेनिंगच्या माध्यमातून आम्ही अक्षरा मसाले हा ब्रँड तयार केला आणि घरात असणारी स्त्री आज एक उद्योजक म्हणून उदयास आली, आज माझा अक्षरा मसाले हा ब्रँड, माझ्या स्वप्नांना नवा अंकुर देणारा ठरला आहे, असे मत केम येथील प्रियंका निलेश ओहोळ यांनी व्यक्त केले.
अक्षरा मसाल्याबरोबर माही पॉपकॉन, अर्णव आटा चक्की, अक्षरामाही कलेक्शन, आणि नक्ष राजे झेरॉक्स सेंटर एवढे उद्योग चालू असल्याचे सौ.ओहोळ यांनी सांगितले.
करमाळा तालुक्यातील केम येथील प्रियंका निलेश ओहोळ आपल्या उद्योजिका बनण्याच्या प्रवास विषयी सांगताना त्या म्हणाल्या की, गरिबी परिस्थितीतीचा बागल बुवा न करता आपण काहि तरी करायच असा डोक्यामध्ये विचार घुमत होता पंरूतु उद्योग करण्यासाठी भांडवल नव्हते पण इच्छा शक्ती होती. मला तीन लहान मुले असल्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष द्यावे लागत होते, त्यामुळे कधी तरी अडकूनही पडत होते, पण आपणही व्यवसाय करायचा असं मनामध्ये ठाम निश्चय केला होता, त्याचवेळी करमाळा उमेद अभियानामार्फत सीआरपी हसीना पठाण यांनी मला व माझ्यासोबत दहा महिला एकत्र करून माझ्या गटाची निर्मिती केली व असंघटित असलेल्या महिला एकसंघ करून अक्षरा बचत गटाची स्थापना केली.
अक्षरा बचत गटाची सुरवात २५ एप्रिल २०२२, ला केली व आम्हाला ग्राम संघाच्या मिटींगला घेऊन जाऊन बचत गटामार्फत व्यवसायाच्या खुप साऱ्या संधी आहेत, याची माहिती दिली व करमाळा तालुका उमेद अभियान व्यवस्थापक श्री योगेश जगताप साहेब, सीसी खलीपे सर, व पवार सर यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे ठरले, व माझे मिस्टर श्री निलेश ओहोळ यांनी माझ्या पंखांना बळ देण्याचं काम केले, आणि बचत गटामधून आपण एखाद्या व्यवसाय सुरू करू शकतो, आणि तो आपण यशस्वी करू शकतो, असा आत्मविश्वास माझ्यामध्ये तयार झाला, त्याचवेळी हे सर्व शक्य झाले ते करमाळा उमेद अभियान यांच्यामुळे, कारण उमेद अभियानाने आम्हाला शिकवलं होते, एकाच व्यवसायावर अवलंबून बसू नका, नवनवीन प्रयोग करून आपला व्यवसाय आणि आपल्या व्यवसायाला कशी भरभराटी येईल, याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे, आणि याच मार्गदर्शनावर आज माझी यशस्वी वाटचाल चालू आहे, नव्या क्षितिजाचे नवे स्वप्न आज माझे साकार झाले आहे, आज मी महिन्याला 18 ते 20 हजार रुपये माझ्या उद्योगांमधून मी कमवत आहे, याचं सर्व श्रेय उमेद अभियान व माझ्या स्वप्नांसाठी रक्ताचे पाणी करणारे माझे पती श्री निलेश ओहोळ यांना जाते, बचत गटातून मी गटाचे अध्यक्ष, ग्राम संघाची लिपिका, करमाळा तालुका ग्राम संघ ऑडिटर, व कृषी सखी, इतके पद मी भूषवली आहेत, हे सर्व शक्य झालं ते उमेद अभियानामुळे!
या वेळी यशामागे श्रेय देताना त्यांनी उमेद अभियान करमाळा, कृषी टीम, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ अक्षरा स्वयंसहाय्यता समूह, पती श्री निलेश ओहोळ, सासू-सासरे, आई वडील, भाऊ यांना दिले.