सौ. प्रतिभा घनवट यांचे निधन

करमाळा, ता.24: भोसे येथील सौ. प्रतिभा शंकर घनवट (वय 48) यांचे अल्पशा आजाराने काल (ता.२३) रात्री ६-३० वा. निधन झाले. भोसे येथे रात्रीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्यामागे पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सौ. घनवट या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचे निधन झाले.अतिशय कष्टाळू व मायाळू म्हणून त्यांची ओळख होती.घनवट परिवारात त्या जिद्दीने काम करत होत्या,परंतु अचानक त्यांचे निधन झाले. त्यांचे अकस्मात निधन झाल्याने भोसे येथील घनवट व सुरवसे परिवारावर दुःखाची छाया पसरली आहे. भोसे येथील प्रगतशील शेतकरी शंकर घनवट यांच्या त्या पत्नी होत्या तर भोसे येथील माजी उपसरपंच व माजी मुख्याध्यापक एन डी सुरवसे सर यांच्या त्या भगिनी तर भोसेच्या सरपंच अमृता सुरवसे यांच्या मावळन होत्या.






