सामाजिक विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेलगाव क येथील सौ.वीर व सौ.काटुळे यांचा होळकर पुरस्काराने सन्मान…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महिला व बालविकास ,शिक्षण ,आरोग्य जनजनजागृती या विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शेलगाव (क) (ता.करमाळा) येथील सौ.कविता सुनील वीर व सौ.जयश्री पांडुरंग काटुळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सन्मानित करण्यात आले.
31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023 -24 चे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षीपासून ग्रामपंचायत स्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यास प्रारंभ झालेला आहे. प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, पुष्पहार ,शाल व पाचशे रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. महिला व बालविकास ,शिक्षण ,आरोग्य जनजनजागृती या विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गावातील महिलांचे अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यामधून महिला बचत गटांचे जाळे निर्माण करणाऱ्या सौ.कविता वीर व कोविड योद्धा म्हणून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ.जयश्री काटुळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच अशोक काटुळे, उपसरपंच सचिन वीर, आत्माराम वीर, राहुल कुकडे, ग्रामसेवक खाडे ,राजाराम वीर ,आनंद वीर , संदीप पाटील, मुकुंद कुकडे, बाळनाथ वीर,सौ.करुणा बनसोडे ,सौ गंगा काटुळे ,सौ. त्रिशला वीर ,सौ मीना वीर, सौ सारिका वीर, सौ पद्मिनी वीर, सौ.गंधारबाई वीर, सौ. भीमाबाई वीर,सौ. सीमा जाधव,सौ.पायल वीर,सौ. प्रतिभा पाटील,सौ. छाया वीर ,सौ.अलका वीर,सौ. अनिता वीर,सौ. शालन वीर ,सौ.कुसुम वीर ,सौ.मीनाक्षी वीर ,सौ.सविता सपाटे,सौ.मनीषा सपाटे ,सौ.संगीता सपाटे ,सौ.तारामती वाघमारे ,सौ.शैला बनसोडे ,सौ.विमल वीर,सौ. सविता वीर आदी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.