मुमताज सय्यद यांचे निधन

करमाळा(संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील ज्येष्ठ नागरिक मुमताज हाजी शौकत सय्यद (वय 93) यांचे आज (ता.8) दीर्घ आजारानंतर वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. सौम्य व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्या सुसंवादक व आदरणीय म्हणून ओळखल्या जात होत्या. आज (ता.8) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कब्रस्तान मध्ये धार्मिक परंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुमताज सय्यद या ज्येष्ठ पत्रकार अशपाक सय्यद यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने सय्यद कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.