पोथरे येथील शेतकरी मुरलीधर झिंजाडे यांचे निधन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३:पोथरे येथील ज्येष्ठ शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर राघु झिंजाडे (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गावात ते ‘तात्या’ या नावाने परिचित होते. अत्यंत काटक, उत्साही व परिश्रमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
अखेरपर्यंत सक्रिय राहणारे मुरलीधर झिंजाडे हे रोज शेतातून करमाळा आणि करमाळ्यातून शेतापर्यंत चालत जाऊन येत असत. किरकोळ आजाराने ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर पोथरे येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीस पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरलीधर झिंजाडे हे लेखा परीक्षक प्रवीण झिंजाडे अभियंता कांचन झिंजाडे व रविंद्र झिंजाडे यांचे आजोबा होते.
