साडे येथील १९ वर्षाच्या युवकाचा खून
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : साडे येथील १९ वर्षाच्या युवकाचा खून झाला आहे. हा प्रकार २४ फेब्रुवारी रोजी घडला आहे. ४ यात बालिका राजु काळे (रा. साडे ) या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की माझा भाऊ रोहित काळे (वय १९) हा साडे येथील घरातून सायंकाळी ४ वाजता गावातून येतो म्हणून गेला तो परत आला नाही.
त्याचा शोध घेत असताना दुसऱ्या दिवशी (ता. २५) तो सौंदे हद्दीत सापडला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. ही बाब पोलीसांना कळवली. पोलीसांनी त्याला ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात आणले. त्यावेळी डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले. त्याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.