बिटरगाव सहकारी संस्थेचे चेअरमन मुरूमकर यांचे निधन

करमाळा (दि.१४): बिटरगाव (श्री) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन लालासाहेब विनायक मुरूमकर (वय ६१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मध्यरात्री निधन झाले. लालासाहेब मुरूमकर हे संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. अवघ्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या सुनेचे – मनिषा नितीन मुरूमकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्या दुःखातून सावरण्याआधीच मुरूमकर यांचे निधन झाल्याने संपूर्ण मुरूमकर कुटुंब शोकाकुल झाले आहे. मुरूमकर हे जगताप गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.






