मराठा समाजाच्या शांतता रॅलीत मुस्लिम बांधव देखील झाले सामील
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल (दि.७ ऑगस्ट) सोलापूर येथे निघालेल्या शांतता रॅलीमध्ये करमाळा येथील मुस्लीम बांधव देखील सहभागी झाले होते.
या शांतता रॅली मध्ये उपस्थित राहण्या विषयी मुस्लिम युवक म्हणाले की, काही समाज कंटक नेहमीच हिंदू मुस्लिम समाजामध्ये दुफळी कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत असतात ज्याचा उपयोग ते आपले राजकीय,आर्थिक हित साधण्यासाठी करत असतात. परंतु हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक कार्य करत असतो. या रॅलीत सहभागी होऊन हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश आम्ही महाराष्ट्राला देऊ इच्छितो. मराठा समाज आरक्षण मिळावे याकरिता गेले काही वर्षे झाले संघर्ष करत आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे असे आम्हालाही वाटत आहे. म्हणून आम्ही या शांतता रॅलीत सहभागी झालो असल्याचे युवकांनी सांगितले.
यामध्ये सकल मुस्लीम समाज करमाळाचे शहर अध्यक्ष जमीर सय्यद आझाद शेख, दिशान कबीर,आलिम खान, साजिद बेग, शफिक शेख.आलीम शेख,अफजल कुरेशी,खलील कुरैशी,अरबाज बेग, इकबाल शेख,शाहीद बेग,कलीम शेख,कय्युम मदारी, इरफान सय्यद आदीजन यांसह अनेक मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते.