‘आषाढी एकादशी’ दिवशी करमाळ्यात बकरी ईदची कुर्बानी नाही – मुस्लिम बांधवांनी घेतला निर्णय..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘आषाढी एकादशी’च्या दिवशी ‘बकरी ईद’ असल्याने पवित्र एकादशी दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय करमाळा शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
करमाळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी शहरातील हिंदू- मुस्लिम बांधवांची कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित मुस्लिम बांधवांनी पवित्र आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद च्या दिवशी फक्त नमाज पठण करण्यात येऊन या पवित्र दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कलिम काझी, नजीर अहमद शेख, फारूक बेग, फारुक जमादार, आयुब शेख, मुस्तकीम पठाण, आझाद शेख, जीशान कबीर, सिकंदर फकीर आदी उपस्थित होते.