पुण्यातील आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनचे दैदिप्यमान यश -

पुण्यातील आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत मुथा नॉलेज फाउंडेशनचे दैदिप्यमान यश

0

करमाळा, ता.२०: पुणे (भोसरी) येथे १८ जानेवारी रोजी अरिस्टो किड्स यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेत करमाळा येथील मुथा नॉलेज फाउंडेशन अंतर्गत मुथा अबॅकस अकॅडमीने घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत देशभरातील विविध राज्ये व जिल्ह्यांमधून तब्बल २३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमीचे ४२ विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांना १० मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवणे बंधनकारक होते. स्पर्धेच्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करून पालकांच्या प्रचंड उपस्थितीत भव्य बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

  • अबॅकस लेव्हल फिफ्थमध्ये
  • श्रावणी महेश गवळी – द्वितीय क्रमांक
  • सई विनोद पडवळे – तृतीय क्रमांक
  • अबॅकस लेव्हल थर्डमध्ये
  • रिदम भूपेंद्र बोराडे – तृतीय क्रमांक
  • अबॅकस लेव्हल फर्स्टमध्ये
  • अनुष्का ब्रह्मदेव नलवडे – प्रथम क्रमांक
  • अबॅकस लेव्हल झिरो (ज्युनिअर गट)
  • जेऊर इरा पब्लिक स्कूलचा समर्थ सूर्यकांत चौधरी – द्वितीय क्रमांक
  • ज्युनिअर गटामध्ये
  • शिवांजय उमेश सावंत – प्रथम क्रमांक
  • अक्षता माधव कदम – चतुर्थ क्रमांक


विशेष म्हणजे, रँक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी केवळ चार ते पाच मिनिटांत १०० गणिते अचूक सोडवून आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली. वरील सर्व विजेत्यांना मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा सरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

याच कार्यक्रमात मुथा नॉलेज फाउंडेशनचा मास्टर जीनियस विद्यार्थी सार्थक मकरंद वनारसे याने अबॅकसचे दहा लेव्हल पूर्ण केल्याबद्दल ‘मास्टर ऑफ अबॅकस’ डिग्री अवॉर्ड, ट्रॉफी व सन्मानचिन्ह मिळवले. पदवीदान समारंभात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय शायनिंग स्टार अवॉर्ड प्राप्त विद्यार्थी:
आर्यन जाधव, राजवी मोरे, स्वरा जाधव, समर्थ सूर्यवंशी, सानवी राठोड, आदिती खरात, सानवी गणगे, राजवीर पोळ, नेत्राली शिरसकर, वेदांत रोडे, शर्वरी शिंदे, शिवम सूर्यवंशी, स्वरा पडवळे, कृष्णा माळी, शिवेंद्र गरड, शिवराज ढवळे, शिवम ढवळे, आहिल बागवान, अनन्या फंड, प्रतीक सावंत, ओजस गांधी, देवांशी शिंदे, आयुष नलवडे, सिद्दीक बागवान.

रनरअप अवॉर्ड प्राप्त विद्यार्थी:
साई काळे, ऋषिराज लष्कर, मयंक गवळी, साद बागवान, नमोकार शहा, अभिराज यादव, चैतन्य मरोडकर.

सहभागी विद्यार्थी: कार्तिक शिंदे.

या यशामागे संस्थापिका ज्योती मुथा  तसेच सौ.वनारसे, सौ.सावंत , गौरी व दिपाली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उत्कृष्ट कार्याची दखल घेत ज्योती मुथा यांना ‘बेस्ट अकॅडमी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक स्तरावर यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!