सालसे शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारिणीची बिनवरोध निवड – अध्यक्षपदी नागेश ओहोळ

करमाळा, दि. १ नोव्हेंबर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालसे येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेत आणि बिनविरोध पार पडली. या समितीच्या अध्यक्षपदी नागेश संपत ओहोळ यांची तर उपाध्यक्षपदी पायल लहू पवार यांची निवड करण्यात आली.

शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रशालेतील सर्व विद्यार्थी पालक आणि माता-पालक उपस्थित होते. निवड प्रक्रिया निर्णय अधिकारी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विष्णू हेळकर यांनी पार पाडली.
समितीमध्ये सदस्य म्हणून गणेश श्रीपती पाटील, विनायक रामदास सालगुडे, राजेंद्र गेना काळे, तहसीन जक्रोद्दिन मुजावर, माधुरी नागेश रुपनर, ज्योती बन्शीलाल भोसले, अंकुश अजिनाथ पवार यांची निवड करण्यात आली. तर शिक्षणतज्ज्ञ म्हणून धनाजी सर्जेराव माने यांची निवड झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष कुंभार यांनी मानले. या प्रसंगी माजी अध्यक्ष आणि सालसे येथील उद्योजक सतीश रुपनर यांनी नव्याने निवडलेल्या समितीचे अभिनंदन करून मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला गणेश जाधव, आबासाहेब सालगुडे, नितीन रुपनर, दशरथ पवार, राम लोकरे, भैरवनाथ रुपनर, नवनाथ पवार, सचिन सालगुडे, अंगद पवार, निलेश सालगुडे, गोपीनाथ भोसले, दत्ता काकडे, राजू पोळ, हनुमंत सालगुडे, फिरोज मुलाणी, नागेश माने, हनुमंत पवार, हरी येवले, संदीप येवले, धनेश सालगुडे, संदीप वायकुळे, तसेच सहशिक्षिका आशा कदम, सौ. पुराणिक आणि अनेक पालक व महिला वर्ग उपस्थित होता.
नवीन शाळा व्यवस्थापन समितीला उपस्थितांनी शुभेच्छा देत, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि शाळेचा सर्वांगीण विकास साधणे हेच समितीचे ध्येय असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली



