परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात - नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड -

परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात – नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास करणारी मुलेच इतिहास घडवू शकतात, असे प्रतिपादन नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांनी शेटफळ (ता.करमाळा) येथील जिव्हाळा ग्रूपच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विकास गुंड होते. काही काळापुर्वी प्रशासन व इतर क्षेत्रात उच्च पदावर केवळ प्रास्तापितांचीच मक्तेदारी समजली जात होती परंतु सध्या गरीब शेतकरी शेतमजूरांची मुलांना आपल्या बुद्धी व कष्टाच्या जोरावर उच्च पदावर संधी मिळू लागली आहे ही मुलं आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करत आहेत आशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतात. अशा विद्यार्थ्यांच्या पाटीवर कौतूकाची थाप पडणे गरजेचे आहे.शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुप हे काम नियमितपणे करत असल्याने या ग्रुपचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.

यावेळी गायकवाड यांना पदोन्नती मिळून त्यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. धनराज निलचंद दुरंदे याने निट परिक्षेत उत्तम गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल त्याचा आईवडीलांसह सत्कार करण्यात आला त्याबरोबरच स्कॉलरशिप सह इतर परिक्षेत यश मिळवल्याबद्ल विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जिव्हाळा ग्रूपचे वैभव पोळ यांनी केले.सत्कारमुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला सरपंच विकास गुंड आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक सुरेश पोळ मकाईचे माजी संचालक किरण पोळ माजी सरपंच मुलीधर पोळ अनिल पोळ विजय लबडे नानासाहेब साळूंके संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुहास पोळ, राजेंद्र साबळे, विष्णू पोळ , महावीर निंबाळकर, संतोष घोगरे योगेश घोगरे शरद पाटील यांच्यासह ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिव्हाळा ग्रुपचे गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!