राजुरी येथे नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : न्याय व सामाजिक सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नशा मुक्त भारत अभियान नुकतेच राजुरी (ता.करमाळा) येथील राजेश्वर विद्यालयात मोठया उत्साहात पार पडले. यामध्ये शाळेचे विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला नशा मुक्त भारत अभियानचे सोलापूर जिल्हा ब्रँड ॲम्बेसेडर श्री महेश वैद्य यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुले ही अनुकरन प्रिय असतात. त्यामुळे घरातील पालकांनीही मुलांना तंबाखू,गुटखा मावा, दारू, गांजा इत्यादी नशा युक्त पदार्थ आणण्यास भाग पाडू नये जेणेकरून मुलांना त्याचे व्यसन लागणार नाही याची काळजी घरातील पालकांनी घ्यावी आणि त्यांच्यासमोर कोणतेही व्यसन करणे टाळावे. मुलांना चांगल्या कामात नेहमी प्रो्साहन द्यावे. शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित अर्धा तास व्यायाम करावा जेणेकरून शरीर सशक्त बनेल पण हल्ली याचा बऱ्याच ठिकाणी अभाव आहे विद्यार्थी दशेमध्ये हा अभाव प्रकर्षाने जाणवतो याचा विचार पालकांनी शिक्षकांनी करणे ही काळाची गरज आहे. बल बुद्धी आणि विद्या या सात त्रिवेणी संगम असेल तर जीवनामध्ये हमखास यश प्राप्ती होतेच आणि कोणत्याही खडतर प्रसंगाला तोंड द्यायचे ताकद निर्माण होते. ज्या व्यक्तीला आरोग्याचे महत्त्व समजले अशा व्यक्ती सहसा नशेच्या आहारी जात नाहीत असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले. व्यायाम हा सगळ्यांना माहित असतो पण तो कसा करावा कधी करावा किती करावा याचे एक शास्त्र आहे व्यायाम करताना श्वास आणि शरीराची कृती यांची सांगड घालने गरजेचे आहे. आपले जीवन आनंदमय बनवा त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी जाऊ नये, नशा मुक्त भारत आणि सशक्त भारत अभियान ही आज काळाची गरज आहे. नशे पासून तरुणाईचे होत असलेले पतन याचा विचार करून भारत सरकार सर्व देश पातळीवर नशा मुक्त भारत अभियान राबवित आहे. दिवसेंदिवस तरुणाईला नाशेचा विळखा पडत आहे. नशा ही समाजाला लागलेली कीड आहे व त्याला कुठेतरी आळा बसणे आवश्यक आहे त्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे असे स्पष्ट मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.
राजेश्वर शाळे तील विद्यार्थ्यांनी थ्रो बॉल स्पर्धेत जिल्हास्तरीय यश संपादन केले त्या बद्दल महेश वैद्य यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक वर्गाचे अभिनंदन केले.
सशक्त भारत अभियान द्वारे महेश वैद्य यांनी विद्यार्थ्यांकडून बेसिक व्यायामाचे प्रशिक्षण कृतीद्वारे करून घेतले यात 260 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला..
अशा प्रकारची उपक्रमाचे सर्व समाजाला खूप गरज आहे असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल झोळ यांनी केले . महेश वैद्य यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल झोळ यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला करमाळ्यातील उद्योजक व भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांनी महेश वैद्य यांचा परिचय करून दिला. तसेच श्री.कुलकर्णी यांचादेखील सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक श्री अनिल सोपान झोळ श्री मारुती संदिपान साखरे श्री विजय नारायण गरड श्री अमोल सोपान कोल्हे जगन्नाथ नारायण अवघडे श्री गंगाराम जगन्नाथ वाघमोडे रत्नाकर पांडुरंग तळेकर श्री कल्याण त्रिंबक बागडे श्री धनंजय सुखदेव साखरे आदीजन उपस्थित होते.