सुशील चव्हाण यांना राष्ट्रीय महा ऍग्रो आयडॉल पुरस्कार प्रदान

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – भाळवणी, ता. करमाळा येथील सुशील चव्हाण यांना राष्ट्रीय महा ऍग्रो आयडॉल पुरस्कार २०२३ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
सुशील चव्हाण हे श्री. दत्त इंजिनिअरींग वर्क्स हा व्यवसाय चालवतात, आधुनिक काळात शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे ते शेती आवजारांची निर्मिती करतात, त्यांनी आत्तापर्यंत अनेक ऊस लावणी यंत्र, खत पेरणी यंत्र, उसाची अंतर्गत मशागत अशी अनेक प्रकारच्या औजारांची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यांना ऍग्रोकेअर कृषिमंच नाशिक यांचा मानाचा राष्ट्रीय महा ऍग्रो आयडॉल पुरस्कार देण्यात आला आहे. चव्हाण यांना पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करमाळा तालुक्याचे मा. आमदार नारायण पाटील यांनी देखील त्यांचा सत्कार केला.



