स्वबळावरच निवडणूक लढवा! संजयमामा शिंदेंच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास -

स्वबळावरच निवडणूक लढवा! संजयमामा शिंदेंच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास

0


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :

करमाळा :  तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) चा भव्य कार्यकर्ता मेळावा आज 12 जानेवारी रोजी नालबंद मंगल कार्यालय, करमाळा येथे उत्साहात पार पडला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात युती आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.


या मेळाव्यात विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात असा जोरदार आग्रह धरला. कुर्डूवाडी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या यशाचा दाखला देत, जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आगामी निवडणुकांतही यश निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


कार्यकर्त्यांचा विश्वास – नेतृत्वावर ठाम
ॲड.अजित विघ्ने, ॲड.नितीन राजेभोसले, अण्णासाहेब पवार, सुजित तात्या बागल, रोहिदास सातव, दत्तात्रय अडसूळ, दादासाहेब जाधव, विनय ननवरे, रवींद्र वळेकर आदींनी भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. संजयमामा शिंदे यांच्या विकासकामांची दखल मतदार घेत असल्याने विजय निश्चित आहे, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला.

या मेळाव्यास सुभाष आबा गुळवे, तात्यासाहेब मस्कर, चंद्रकांत सरडे, राजेंद्रकुमार बारकुंड, नवनाथ भांगे, विलास दादा पाटील, तानाजी झोळ, विलास राऊत, अशोक पाटील, विवेक येवले, निळकंठ अभंग, तात्यासाहेब जाधव, चंद्रहास निमगिरे, सुहास रोकडे, उद्धव दादा माळी, डॉ. गोरख गुळवे, आर.आर. बापू साखरे, अभिजीत पाटील, शंकर जाधव, सुदाम शेळके, राजाभाऊ देशमुख, मयूर पाटील, गौरव झांजुर्णे, गणेश गुंडगिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विरोधकांनी आरोप करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे – संजयमामा शिंदे
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःची लायकी तपासावी, अशा शब्दांत संजयमामा शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.
ज्यांचे स्वतःचे हात भ्रष्टाचाराने माखलेले आहेत, खंडणी व हप्ते मिळत नसल्याने तहसीलदारांवर हक्कभंग आणणारे आणि कंत्राटदारांकडून टक्केवारी न मिळाल्याने दहिगावचे पाईप जाळून विकासकामे थांबवणारे लोक आज माझ्यावर आरोप करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. मी जाती-नात्याचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो. दोन निवडणुकांमध्ये पराभव होऊनही एकही कार्यकर्ता दूर गेला नाही, हेच माझे नैतिक बळ आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदार आपल्यालाच कौल देतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

कारखाना चालवण्याची क्षमता नाही – सुभाष गुळवे
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी नारायण पाटील यांच्यावर तीव्र टीका केली.
कारखाना सुरू करण्याची आवश्यक पात्रता त्यांच्याकडे नाही. सभासदांनी विश्वासाने सत्ता दिली असतानाही आमदार व चेअरमन यांचा स्वतःचा ऊस दुसऱ्या कारखान्याला जात आहे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांनंतर हा कारखाना निलावात निघण्याची शक्यता असून तो वाचवण्याची ताकद या आमदारांकडे नाही, असा आरोप करत संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!