'नवभारत प्रतिष्ठाण'चे अध्यक्ष भास्कर पवार यांना "क्रांतीसुर्य सत्यशोधक समता पुरस्कार" प्रदान.. - Saptahik Sandesh

‘नवभारत प्रतिष्ठाण’चे अध्यक्ष भास्कर पवार यांना “क्रांतीसुर्य सत्यशोधक समता पुरस्कार” प्रदान..


करमाळा / संदेश प्रतिनिधी : रावगाव (ता.करमाळा) येथील राजीव गांधी सार्वजनिक वाचनालयाचे सचिव व नवभारत प्रतिष्ठान रावगाव चे अध्यक्ष भास्कर पवार यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले प्रतिष्ठान रावगाव यांच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार मा.सरपंच विलास बरडे ,मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गोवर्धन करगळ, सरपंच संदीप शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार ,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भास्कर पवार यांनी आजपर्यंत वाचनालय व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गावात व परिसरात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल ,श्रीफळ देऊन हा गौरव करण्यात आला आहे.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठान च्या वतीने प्रत्येक वर्षी हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो या आजपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.बाबुराव हिरडे तसेच यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे मा.गणेश करे पाटील यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले प्रतिष्ठान रावगाव चे अध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी सांगितले की यापुढेही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींबरोबरच शालेय विद्यार्थ्यांमध्ये नैपुण्यपूर्ण गुण तसेच विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक कमावलेल्या विद्यार्थ्यास पुरस्कार व बक्षीस देण्यात येणार आहेत हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत शिंदे व त्याचे सहकारी यांनी परिश्रम घेतले परिश्रम घेतले. याकार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक बबन पाटूळे, शिक्षक महेंद्र शिंदे, प्रताप राऊत, बबन रासकर, लक्ष्मण रासकर, आण्णासाहेब शिंदे, विकास नाईकनवरे,ज्ञानेश्वर पवार, दादासाहेब पवार, ग्रामविकास अधिकारी हजारे आर.के.भूजबळ, आजीमाजी पदाधिकारी,ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!