पोथरे येथील ह.भ.प. नवनाथ झिंजाडे  यांचे निधन..

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.2) : पोथरे येथील ह.भ.प.नवनाथ साहेबराव झिंजाडे (दुकानदार) (वय-48) यांचे अल्प अजाराने काल (ता.1) रात्री 11-30 वाजता दौंड येथे निधन झाले. श्री.झिंजाडे यांचे पोथरे (ता.करमाळा) येथे किराणा दुकान होते. तसेच ते उत्तम गायक व किर्तनकार होते. पोथरे ते पंढरपूर येथे आषाढी वारीला दिंडी काढत होते व त्या दिंडीचे ते दिंडीचालक होते. गेल्या तीन महिन्यापूर्वीच त्यांचे लहान भाऊ  बाबूराव झिंजाडे यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर ते खचले होते. त्यानंतर आजारी पडले. करमाळा, नगर, श्रीगोंदा व दौंड येथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी, दोन पुतणे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!