नेरले सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व -  चेअरमनपदी तानाजी जगताप.. -

नेरले सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व –  चेअरमनपदी तानाजी जगताप..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : नेरले (ता.करमाळा) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप व माजी नारायणआबा पाटील यांचे ग्रामविकास पॅनेलने आमदार शिंदे यांच्या गटाचा पराभव केला आहे.

त्यामध्ये विजयी उमेदवार तानाजी जगताप, राहुल भोसले- पाटील, शहाजी गवळी, तात्यासाहेब कोपनर, अनिस मोमीन, अभिमान लोंढे, सखाराम ठोंबरे, रुपेश पोळ, नानासाहेब नाईक, सतीश शेळके, कान्होपात्रा पन्हाळकर, पद्मिनी दौंड, सुरेखा गलांडे यांचा समावेश आहे. याप्रसंगी चेअरमनपदाच्या निवडणुकीमध्ये चेअरमनपदासाठी तानाजी जगताप व व्हाईस चेअरमन पदासाठी राहुल भोसले -पाटील यांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मुंडे मॅडम यांनी केली.

तानाजी जगताप हे तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवडून आले आहेत. ते प्राध्यापक धनंजय पन्हाळकर यांचे भाचे असून जयवंतराव जगताप गटाचे समर्थक आहेत. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोघांचाही सत्कार जगताप गटाचे युवा नेते माजी नगराध्यक्ष नारायण बापू जगताप यांनी केला, याप्रसंगी गावातील बंटी शेठ जाधव, महेश राजे भोसले- पाटील, विजय पन्हाळकर, काकासाहेब पाटील, नानासाहेब जगताप, बाळासाहेब गवळी, अप्पाराव हंडाळ, पैलवान दादासाहेब दोंड, बंटी सावंत, बिभीषण सुरवसे, दादासाहेब दोंड(फिटर), उत्तम पन्हाळकर, गणेश गलांडे, समाधान गलांडे, अमृत गायकवाड, रामकृष्ण पोळ, जयनंद बापू पोळ, बंडोबा पाटील, दतात्रय पोळ इत्यादी गावातील कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी संस्थेचे सचिव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सदाशिव पाटील यांनी मार्गदर्शन केले दोन्ही गट एकत्र करण्यामध्ये विजय पन्हाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली व त्या मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!