करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी विलासराव घुमरे, उपाध्यक्ष विनोद चव्हाण तर सचिवपदी बाळासाहेब होसिग यांची सर्वानुमते निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक कमलाई मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत असोसिएशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी विलासराव घुमरे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी विनोद चव्हाण तर सचिवपदी बाळासाहेब होसिग यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीस तालुक्यातील विविध मंगल कार्यालयांचे मालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये जयराम सोरटे, भाऊराव कदम, अनिल कादगे, दत्ता भुजबळ, तानाजी महामुनी, प्रवीण चांदगुडे, स्वप्नील सालगुडे, कुमार कदगे, संदीप बोकन, संदीप रोडगे, मोहन टिकोरे, मोहसीन नालबंद, देवकर भाऊसाहेब, विनोद शिंदे, महेश सुर्यपुजारी, दिगंबर झोळ आदींचा समावेश होता. या बैठकीत असोसिएशनच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली असून मंगल कार्यालय व्यवसायातील विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



