चिखलठाण येथे नूतन सरपंच व पोलीस झालेल्या व्यक्तींचा सत्कार संपन्न

करमाळा (दि.१७) – चिखलठाण (ता. करमाळा) येथील शुभम लगस व धनाजी राऊत यांची पोलीस पदी निवड झाल्याबद्दल पांडुरंग लबडे यांची शेटफळ सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शेठफळ येथील जाणता राजा गणेश मंडळाच्या कार्यालयात करण्यात आला.
याप्रसंगी राजेंद्र बारकुंड यांनी सर्व सत्कारमूर्तींना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी चिखलठाणचे सरपंच प्रतिनिधी विकास गलांडे, जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष समाधान गव्हाणे,राहुल गोळे विठ्ठल राऊत, नितीन धेंडे आबा नलवडे रोहित कोकरे प्रमोद गव्हाणे, अक्षय कांबळे, महेश पवार, विशाल लोहार, माऊली कुचेकर, धनराज गेंडे इत्यादी बापूराव गोळे संतोष उंबरे विश्वजीत रोकडे प्रीतम गोळे धनराज गोळे इत्यादी उपस्थित होते








