गावाचा विकास हेच माझे ध्येय राहणार - नूतन सरपंच सारिका कोरे - Saptahik Sandesh

गावाचा विकास हेच माझे ध्येय राहणार – नूतन सरपंच सारिका कोरे

केम (प्रतिनिधी/संजय जाधव)  –  केमच्या जनतेने माझ्यावर सरपंच पदाची जी जबाबदारी टाकली तिला कोणत्याही प्रकारे तडा जाऊ न देता, ही जबाबदारी मी यशस्वी करून दाखवेल. गावाचा विकास हेच माझे ध्येय राहणार असल्याचे प्रतिपादन केमच्या नूतन सरपंच सारिका कोरे यांनी त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी एक महिला असल्याने माझे लक्ष महिला सबलीकरणाकडे राहणार आहे. महिला स्वावलंबी बनल्या पाहिजे शासनाच्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्याची मी अंमलबजावणी करणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश तळेकर यांनी केले ग्रामसभेचे महत्त्व यांवर त्यानी मार्गदर्शन केले
या वेळी नूतन सदस्य नागनाथ तळेकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडक सात मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्या प्रमाणे आपले विजयी सात शिलेदारांना बरोबर घेऊन सरपंच आपला असल्याने विकास कामात कोणताही अडथळा येणार नाहीं.

या वेळी पॅनल प्रमुख अजितदादा तळेकर म्हणाले मी राजकारणापेक्षा विकास कामावर लक्ष देणार प्रभाग निहाय जनतेच्या समस्या सोडविणार मागील काही चुकांमुळे या निवडणुकीत आपल्या जागा कमी झाल्या तरी जनतेने आपला सरपंच निवडणून दिला आहे जनता आपल्या पाठीशी आहे आपल्या मतांची बेरीज विरोधी पॅनल पेक्षा जास्त आहे आता आपले लक्ष जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या साठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करायची, त्यासाठी विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांनी लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात पराभूत उमेदवारांचा सन्मान करण्यात आला या वेळी सर्व १७ उमेदवार उपस्थित होते. या सत्कार समारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाणता राजा स्पोर्ट क्लब व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश तळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर दादा तळेकर व श्री हरि तळेकर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!