करमाळा येथे नवीन अत्याधुनिक सारंगकर डेंटल हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न

डॉ. मिलिंद पारीख व डॉ संजय कोग्रेकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील सारंगकर डेंटल क्लिनिक चे डॉ चंद्रकांत सारंगकर व डॉ निशा सारंगकर यांच्या डेंटल सिटी स्कॅन व अत्याधुनिक डेंटल हॉस्पिटल चे उदघाटन मॅनेजिंग डायरेक्टर व मेडिकल डायरेक्टर UAIMS हॉस्पिटल सांगलीचे डॉ मिलिंद पारीख व डॉ संजय कोग्रेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी करमाळा ततालुक्यातील तसेच अकलूज पंढरपूर नगर पुणे कोल्हापूर येथून आलेले त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स नातेवाईक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व व्यापारी असे सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ चंद्रकांत व डॉ निशा सारंगकर यांनी नवीन हॉस्पिटल विषयी माहिती सांगताना म्हणाले की, करमाळा तालुक्यातील रूग्णांना चांगल्या प्रकारची अत्याधुनिक सेवा बाहेर न जाता व कमी खर्चात करमाळा येथेच मिळावी या उद्देशाने हे नवीन हॉस्पिटल उभारले आहे. यासाठी असणारे अत्याधुनिक असे डेंटल सिटी स्कॅन ,अत्याधुनिक जंतू नासकीकरण विभाग , डिजिटल स्कॅनर ,लेसर त्यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिला असून अशी सर्व उपचार एकाच छताखाली सेवा देणारे त्यांचे ग्रामीण महाराष्ट्रा तले पहिले हॉस्पिटल आहे . 4 डेंटल चेअर चा सेट अप असून 4 पूर्ण वेळ काम करणारे दंत रोग तज्ज्ञ व 3 व्हिजिटिंग डेंटल सर्जन उपलब्ध आहेत ,लहान मुलांचा विभाग , अत्याधुनिक रूट कॅनॉल ,दंत रोपण व लेझर विभाग आहेत. या सर्व सुविधांचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!