कवीटगाव येथे “निर्भया पथक जागर स्त्रीशक्तीचा” कार्यक्रम संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
नवरात्र उत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवीटगाव (ता. करमाळा) येथे महिला जागर या उपक्रमांतर्गत “निर्भया पथक जागर स्त्रीशक्तीचा” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास करमाळा तालुक्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा म्हस्के प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थिनींना निर्भया पथकाचे उद्दिष्ट, कार्य, महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सायबर क्राईम, बालविवाह रोखणे, याबाबतही त्यांनी माहिती दिली. पोलिस हेल्पलाईन नंबरचे महत्त्व समजावून सांगत मुलीमध्ये आत्मविश्वास देणारी अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली.
त्यांच्या सोबत इंगळे मॅडम, पोलीस प्रतिनिधी श्री.पवार,श्री. गुटाळ हेही उपस्थित होते. निर्भया पथकाने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे , रोहिणी वीर , सरोजिनी सराटे , पार्वती कुंभार , शिक्षक श्रीकृष्ण जगदाळे दत्तात्रय खराडे , काशिनाथ गोमे आदी मान्यवर उपस्थित होते.




