निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे केम येथे स्वागत
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : आषाढी वारी करून पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील निघालेल्या निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे केम (ता. करमाळा) येथे तोफांच्या सलामीत ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
पौर्णिमेचा काला घेऊन निवृत्ती नाथाची पालखीचे केम येथे दि. १५ रोजी सायंकाळी सहा वाजता आगमण झाले.
या वेळी केम ग्रामस्थांनी २५ तोफांच्या सलामीत जोरदार स्वागत केले. त्यानंतर तरूणानी पालखी खांद्यावर घेतली. निवृत्ती नाथांच्या जय घोषात पालखी राम मंदिरात मुक्कामासाठी रवाना झाली. या वेळी परिट बंधुनी पालखी साठी पायघड्या घातल्या. पावसाच्या सरी झेलत पालखी सोहळा राममंदिरात पोहचला.
नित्यनेमाप्रमाणे निवृत्ती नाथाची आरती झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी साडे सात वाजता वाटचालीचे कीर्तन झाले. त्यानंतर श्री राम भजणीमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने वारकऱ्यांना भोजन दिले.
सायंकाळी दहा वाजता मंदिरात गावकऱ्यांचा जागर झाला. सकाळी सहा ते सात या वेळेत ग्रामस्थानी निवृत्तीनाथ ची पुजा केली. वारकऱ्यांना सकाळी नाष्टा दिला. त्यानंतर पालखीचे पुढील मुक्कामासाठी प्रस्थान झाले. या वेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडी सोहळ्यासाठी श्री राम भजनीमंडळ ,ग्रामस्थ,तरूण मंडळ आदींनी परिश्रम घेतले.