कोणताही धर्म जातीभेद शिकवत नाही, अहिंसा, शांतता, सद्भावना हीच शिकवण सर्वधर्मीयांकडून मिळते – शिक्षणमंत्री दिपक केसरकर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कोणताही धर्म जातीभेद शिकवत नाही. अहिंसा, शांतता, सद्भावना हीच शिकवण सर्वधर्मीयांकडून मिळते. ज्यावेळेस शिकवण स्वतःला जातीवर आधारित भारत आणि पाकिस्तान हे देश वेगवेगळे झाले त्यावेळी पाकिस्तानने मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले; परंतु भारताने स्वतःला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित न करता सर्वधर्मसमभाव असलेले राष्ट्र घोषित केले त्यानुसारच आजही भारतात व महाराष्ट्रात हिंदूमुस्लीम गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी करमाळा येथील कार्यक्रमात बोलताना केले.
करमाळा येथील नगरपालिकेच्या शिक्षण मंडळ अंतर्गत असलेल्या नामदेवराव जगताप उर्दू शाळेस इयत्ता नववी व दहावीच्या वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने करमाळ्यातील मंजुरी मंजुरी दिल्याबद्दल सकल सकल मुस्लीम समाजाच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता समिती कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुढे बोलताना शिक्षणमंत्री श्री.केसरकर म्हणाले कि, विरोधकांतर्फे आमच्यावर मुस्लीमविरोधी म्हणून टीका केली जाते, परंतु आम्ही कधीही जातिभेद केलेला नाही, त्याचेच उदाहरण म्हणून करमाळ्यातील उर्दू शाळेला दिलेल्या दोन तुकड्यांची मान्यता होय. उर्दू शाळेला नववी व दहावीच्या वर्गास मान्यता देण्याबरोबरच या वर्गाना शिकविण्यासाठी शिक्षकसुद्धा दिले जातील, असे आश्वासन मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वधर्मसमभावाचे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने मुस्लीम समाजाचा व्होट मशीन म्हणून वापर केला. त्यांच्यामागे आता जाऊ नका, असे आवाहन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
प्रास्ताविक करमाळा नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री.बनसोडे यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार हाजी आसिफ शेख, समीर शेख, मजहर नालबंद यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचेही भाषण झाले. या कार्यक्रमास विलासराव घुमरे, महेश चिवटे, उस्मान तांबोळी, कलिम काझी, शौकत नालबंद, अल्ताफ तांबोळी, मजहर नालबंद, आसिफ शेख, समीर शेख.. मुख्याध्यापक जानवाडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी तालुक्यासह समाजबांधवांची मोठ्या संख्येने परिसरातील उपस्थितीत होती.