पाठक सरांसारखा मार्गदर्शक होणे नाही - अनेकांकडून श्रध्दांजली अर्पण - Saptahik Sandesh

पाठक सरांसारखा मार्गदर्शक होणे नाही – अनेकांकडून श्रध्दांजली अर्पण

करमाळा / संदेश प्रतिनिधी : पाठक सरांसारखा कार्यकर्त्यांची काळजी घेणारा व समाजसेवा करणारा मार्गदर्शक होणे नाही; अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्व.भालचंद्र पाठक सर यांच्या श्रध्दांजलीपर शोकसभा करमाळा तालुका ग्राहक पंचायत व पाठक सरांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यशकल्याणी संस्थेच्या सभागृहात आयोजित केली होती.

त्यावेळी विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी माधुरी परदेशी, आनंद पाटील, ह.भ.प. विठ्ठल महाराज पाटील, ह.भ.प. राजाभाऊ रोंगे, नितीन नलवडे, सचिन साखरे, प्रमोद फंड, रेखाताई परदेशी, भिमराव कांबळे, शि.ना.मोरे गुरूजी, प्रतिक आव्हाड, शिवलाल संचेती, मंजिरी जोशी, मृदुला क्षीरसागर, गणेश करे-पाटील, ॲड.बाबूराव हिरडे, दिपक इरकल, शशिकांत हरिदास, सुभाष सरदेशमुख, रमेश टाकळकर, सुनिता हरिदास, दिपकराव कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेकांना आश्रु अनावर झाले तर अनेकांनी भावना आवरून जीवनातील प्रसंग मांडताना पाठक सरांचं कार्य कसे होते; याची मांडणी केली.

यावेळी सुत्रसंचालन भीष्माचार्य चांदणे, निलेश कुलकर्णी, ॲड. शशिकांत नरूटे यांनी केले. यावेळी चक्रधर पाटील व सौ पाटील मॅडम ब्रम्हदेव नलवडे परमेश्वर भोगल, अभय पुराणिक ,सारंग पुराणिक ,विजय देशपांडे ,डाॅ श्रीराम परदेशी, शिवाजी वीर भिमराव कांबळे, तृप्ती पाठक, माजी मुख्याध्यापिका निलिमा पुंडे ,श्री दिगंबर साळुंखे व सौ.सुलभा साळुंखे ,ललिता वांगडे, शिवाजी वीर, संजय हंडे ,सारिका पुराणिक,निशिगंंधा शेंडे, अनिल शिंदे, गजेंद्र पोळ ,प्रशांत नाईकनवरे, मुरलीधर पोळ आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!