भाळवणी येथील देवस्थानाला बैलगाडी अर्पण - Saptahik Sandesh

भाळवणी येथील देवस्थानाला बैलगाडी अर्पण

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : विविध गावांतील भैरवनाथ देवस्थानच्या यात्रा आता जवळ येऊन ठेपलेल्या आहे. यात्रा उत्सव गावकऱ्यांसाठी एक आनंदाची पर्वणी असल्याने ते दरवर्षी यात्रेची वाट आवर्जून वाट बघत असतात. या यात्रेच्या निमित्ताने अनेक भाविक देवस्थानाला विविध वस्तू अर्पण करत असतात. अशाच प्रकारे करमाळा तालुक्यातील भाळवणी येथील माई हाॅटेलचे मालक आबासाहेब गावडे, भालचंद्र कोपनर, दिपक धेंडे यांच्या वतीने भाळवणी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ चरणी यात्रेच्या मुहूर्तावर बैलगाडी अर्पण केली आहे.

श्री भैरवनाथ चरणी अर्पण केलेल्या या बैलगाडी चे पुजन करताना माई हाॅटेल चे मालक आबासाहेब गावडे माढा तालुक्यातील बादलेवाडी गावचे प्रसिद्ध निवेदक विलास दोलतडे, बाबासाहेब कोपनर भालचंद्र कोपनर,प्रसाद गावडे, पै.दिपक धेंडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाळवणीमधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!