नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला कमला भवानी चरणी फुल फळांची आरास अर्पण!
करमाळा (दि.४) – करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध श्री कमला भवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला अतिशय उत्साहामध्ये प्रारंभ झाला असून आज दुसऱ्या माळेची श्री कमला भवानीची महापूजा ओंकार पुजारी यांनी मांडली.
भवानी मातेला सर्वालंकार भूषित चंदन मळवट भरवलेल्या आणि त्याच्यावर रेखीव नक्षीकाम केलेला मळवट भरण्यात आला. मानाची झेंडूच्या फुलांची मंडवळी मानकरी फुलारी बंधूंनी अर्पण केली. यावेळी देवीच्या भोवती फळा फुलांची आरास माही डेकोरेशन करमाळा यांनी मांडली. अतिशय आकर्षक असे फळे व फुलांचे रचना मांडून ही आरास करण्यात आलेली आहे. आज दुसरी माळ असल्यामुळे भावीक भक्तांची अलोट गर्दी मंदिरात दिसून येत आहे. या महापूजे वेळी आरती सोहळा संपन्न झाला. “ब्रह्मादीकास कारण होशील तू आई म्हणून तुजला म्हणती सर्व ही माई” या राजे रावरंभा निंबाळकर रचित श्री कमला भवानीची आरती गाऊन आरती सोहळा संपन्न झाला त्यानंतर पंचायतन आरती सोहळा संपन्न झाला.
यावेळी विश्वस्त सोमनाथ चिवटे राजन राठोड सरपंच रेणुका सिद्धेश्वर सोरटे यांचेसह बापूराव पुजारी दादासाहेब पुजारी विजय पुजारी रोहित पुजारी मधुकर सोरटे सहदेव सोरटे तसेच पुरोहित रविराज पुराणिक सुशील पुराणिक मानकरी अभिषेक फुलारी बबन दिवटे प्रमोद गायकवाड शिवाजी पकाले हनुमंत पवार लक्ष्मण हवलदार राजेंद्र शिंदे रमेश येळवणे श्रीकांत गोमे मनोज जामदार पद्माकर सूर्यपुजारी इंताज शेख ईश्वर पवार शंकर पवार व्यवस्थापक अशोक घाटे महादेव भोसले इत्यादी उपस्थित होते. नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र मंडळ मार्फत फराळाच्या पदार्थाची सोय करण्यात आलेली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अन्नछत्र मंडळाचे संयोजक नवनाथ दादा सोरटे यांनी केले आहे.