वृद्ध आजी-आजोबांचे ‘हॅलिकॉप्टर’मध्ये बसण्याचे स्वप्न नातवाने केले साकार- करमाळ्यात घेतली ‘हॅलिकॉप्टरची सैर’..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आजी- आजोबांनी आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून वांगी नं १ (ता.करमाळा) येथील ॠषीकेश देशमुख यांनी करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर सध्या स्व.दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘हेलिकॉप्टर राईड’ मध्ये आपल्या ८३ वर्षीय आजोबांना व ७५ वर्षीय आजीला हेलिकॉप्टर सैर घडवली.
हेलिकॉप्टर मधून फिरून आल्यानंतर आजी आजोबाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. खाली उतरल्यानंतर आपण केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान आपल्याला वाटत असल्याची प्रतिक्रिया दोघांनी यावेळी व्यक्त केली व हा योग आपल्या नातवाने घडवून आणल्याबद्दल नातवाचेही आभार व्यक्त केले.
वांगी (ता.करमाळा) येथे कृषी सेवा केंद्र व शेती साहित्य विक्रीचा ॠषीकेश देशमुख यांचा व्यवसाय आहे.आजची परिस्थिती चांगली असली तरी आजी आजोबांनी अत्यंत खडतर व संघर्षमय परिस्थितीत दिवस काढले आहेत आता चांगले दिवस आल्यानंतर त्यांच्या इच्छा नातू पुर्ण करत असतो. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची त्यांना इच्छा होती या निमित्ताने नातवाने ती पुर्ण केली.
करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनीही आपल्या आईवडिलांना हेलिकॉप्टर ची सैर घडवून आणली :