७ डिसेंबरला श्रीदेवीचामाळ येथे कुस्त्यांचा जंगी आखाडा
करमाळा (दि.६) – कमला भवानी देवी यात्रा महोत्सवानिमित्त उद्या ७ डिसेंबर रोजी श्री देवीचामाळ येथे भव्य जंगी कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या कुस्त्या श्रीदेवीचामाळ येथील राजेरावरंभा तालीम संघ येथे भरविल्या जाणार असून दुपारी तीन वाजता कुस्त्यांना सुरूवात होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली
करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी देवीची कार्तिक उत्सव यात्रा कार्यक्रम १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर च्या दरम्यान पार पडली. कमलाभवानी देवीच्या कार्तिक यात्रेबरोबरच दरवर्षी कुस्त्यांचा आखाडा घेतला जात असतो. यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कुस्तीचा आखाडा ७ डिसेंबर ला पुढे ढकलण्यात आला. दुपारी ३ वाजता आयोजित केलेला आहे.