कुगांव ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना ‘ब्युटी पार्लर आणि टेलरिंग’चे प्रशिक्षण संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गावातील महिलांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी म्हणून कुंगाव ग्रामपंचायत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमान हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांमध्ये गावातील व परिसरातील शंभर महिलांनी सहभाग नोंदवला होता. हे प्रशिक्षण दोन टप्प्यात होते, सकाळी शिलाईचे प्रशिक्षण तर दुपारी ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले जात होते, हे प्रशिक्षण देण्यासाठी निशिगंधा शेंडे या उपस्थित होत्या.
यावेळी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सुवर्णा महादेव पोरे, उपसरपंच प्रकाश डोंगरे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच कौशल्य कामटे ,रेशमा डोंगरे, आशा कामटे,आसमा सय्यद, नवनाथ अवघडे,उदध्व गावडे, तुकाराम हवालदार,आजिनाथ भोसले, महादेव बल्लाळ व यावेळी ग्राम संघाच्या पदाधिकारी आणि महिला बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सीआरपी वंदना झिंजुर्डे यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण उत्तम रित्या पार पडले.