रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने श्री उत्तरेश्वर शैक्षणिक संकुलास शैक्षणिक साहित्य भेट

केम(संजय जाधव): श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, जगदाळे कोचिंग क्लासेस आणि माजी विद्यार्थी इयत्ता दहावी 1993 बॅच यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

या कार्यक्रमास रोटरीयन श्री राजेंद्र सराफ, रोटरीयन श्री गोविंद जगदाळे, रोटरीयन श्री भरत चव्हाण, रोटरीयन श्री वसंत ढवळे, डॉ. नंदाताई तळेकर ,सौ फडके मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरीयन श्री गोविंद जगदाळे यांनी येथील अनेक नवनवीन उपक्रमाचे कौतुक केले. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करून सुसंस्कार बनावे असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री राजेंद्र सराफ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रश्न- उत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक समस्या दूर केल्या.
यावेळी डॉ. नंदाताई तळेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आरोग्य विषयक सल्ला देऊन त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण केले.

यावेळी या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने संगणक – प्रिंटर, सुपारीची रोपे शाळेला भेट देण्यात आली. तसेच मुलींसाठी सॅनिटरी पॅड व आधुनिक डिस्पोजेबल मशीन आणि इयत्ता नववी,दहावी,अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना विवेकानंद बुक बँक अंतर्गत संपूर्ण विषयाची पुस्तके माजी विद्यार्थी इयत्ता दहावी 1993 ची बॅच यांच्यावतीने भेट देण्यात आली.
इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांसाठी रोटरीयन श्री राजेंद्र सराफ यांनी पर्यावरण विषयक दोन तास कार्यशाळा घेऊन त्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि बॅच प्रदान करण्यात आला.
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे ऑक्सिजन पार्कला भेट दिली. तेथील वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वसतिगृह अधीक्षक श्री सागर महानवर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमास श्री दत्ता काका कुलकर्णी, श्री संतोष जगताप, श्री मंगेश वासकर, श्री योगेश वासकर, श्री विनोद तळेकर, श्री प्रमोद शिंदे, श्री संतोष खानट ,श्री प्रशांत रायचुरे,सौ साधना राऊत गोसेवाक श्री परमेश्वर तळेकर पत्रकार श्री राहुल रामदासे हे उपस्थित होते.
प्राचार्य श्री माधव बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.संतोष साळुंखे, प्रास्ताविक प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे तर आभार प्रदर्शन श्री मनोजकुमार पोतदार यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

