तपश्री प्रतिष्ठानच्यावतीने 57 जणांची तपासणी – 28 रुग्ण ऑपरेशनसाठी पुणे येथे रवाना..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (ता.२७) घेण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबिरात 57 जणांची तपासणी करण्यात आली असून 28 रुग्ण ऑपरेशन साठी बुद्रानी हॉस्पिटल पुणे येथे रवाना झाले आहेत.
या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे,अहिल्या बाई होळकर समितीचे बाळासाहेब टकले, ज्योतीरामनाना लावंड, उद्योजक आदेश ललवाणी, दिनेश मडके, विशाल परदेशी, अरुण टांगडे यांचेसह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.
यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी सांगितले की, प्रतिष्ठानच्यावतीने आतापर्यंत 4270 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून, भविष्यातही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला करमाळा शहरातील बायपास चौक येथील देवीचारोड येथे हे शिबीर राबविण्यात येत आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी आयोजकांच्यावतीने सोलापूर जिल्हा मानवधिकार समितीच्या अध्यक्षपदी दिनेश मडके यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. या शिबिरासाठी जमील काझी, रसिकशेठ मुथा,नारायण तात्या पवार, गणेश इंदुरे, सुभाष इंदुरे गुलाम गोस , पृथ्वीराज केंगार , दिनेश मुथा, केतन संचेती वैभव दोषी , गणेश बोरा,वर्धमान खाटेर,अनंत मसलेकर,गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, संतोष भांड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.