बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने करमाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळा संपन्न... - Saptahik Sandesh

बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने करमाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांनचा सन्मान सोहळा संपन्न…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बहुजन मराठी पत्रकार संघाच्यावतीने नुकताच १७ जून रोजी करमाळा येथील पंचायत समिती सभागृहात नुकत्याच दहावी व बारावी मध्ये यशस्वी गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला, बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन करण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिलाध्यक्षा आशाताई चांदणे यांनी केले, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व गटविकास अधिकारी मनोज राऊत, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, करमाळा पोलिस श्री.साने, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, बहुजन मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष अकबर शिकलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बालविकास प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका आतकर, अंगणवाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.माळी गुरुजी व सौ.माळी, तसेच उपस्थित प्रशालेतील सर्व मुख्याध्यापक, यांचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर तालुक्यातील 11 विद्यालयातून 35 गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालक यांचा सन्मान चिन्ह , प्रमाणपत्र , व फुल देवुन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनचा सन्मान करण्यात आला, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यां व पालक यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बहुजन मराठी पत्रकार संघातील पदाधिकारी आशाताई चांदणे जिल्हा महिलाध्यक्षा , प्रमिला जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्षा, बाळासाहेब भिसे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, आबासाहेब झिंजाडे जिल्हा सचिव, प्रमोद खराडे तालुका अध्यक्ष, संभाजी शिंदे तालुका कार्याध्यक्ष, श्री. प्रदिप पवार तालुका सचिव,संजय चांदणे सदस्य, सचिन नवले सदस्य, श्रीमंत दिवटे सदस्य. तसेच बहुजन मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा टिम, व शिक्षक बांधव, पालक, मातापालक, व विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट निवेदक, गायक, सचिन नवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!