ब्राह्मण महिला संघाच्या वतीने नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

करमाळा (दि.१४) -करमाळा येथील ब्राह्मण महिला संघाच्या वतीने नवरात्र उत्सवातील नऊ दिवस विविध उपक्रमांनी साजरा केले. यात श्रीसूक्त पठण, कुंकुमार्चन, महाभोंडला, मूकबधीर शाळेत खाऊ वाटप आदी उपक्रमांचा समावेश आहे.

सौ. मीना दीवाण सौ . ज्योती कुलकर्णी व सौ. आरती सूर्यपूजारी यांच्या घरी श्रीसूक्त पठण व कुंकुमार्चन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मूक बधीर शाळेत सौ वंदना पाटील सौ कमल कुलकर्णी सौ सुलभा देशमुख सौ प्रतिभा कुलकर्णी व सौ. स्वप्ना कुलकर्णी यांच्या कडून खाऊ वाटप करण्यात आला. अष्टमीच्या दिवशी सर्व महिलांनी मिळून महाभोंडला हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक महिलांनी उत्साहाने भाग घेतला.

या वेळी संघाचे अध्यक्ष सौ निलिमा पुंडे उपाध्यक्ष सौ स्वाती मसलेकर सचिव सौ ज्योती कुलकर्णी कोषाध्यक्ष सौ आरती सूर्यपुजारी सहसचिव सौ शुभांगी खळदकर व संपर्क प्रमुख सौ माधुरी भणगे यांनी विशेष परिश्रम घेतले.



