टेकाळे फाउंडेशनच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा आधार -

टेकाळे फाउंडेशनच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा आधार

0

करमाळा :आपत्कालीन परिस्थितीत गरजू लोकांना मदत करणे हेच खरे सामाजिक दायित्व मानत, कै. शिवाजी बलभीम टेकाळे सोशल फाउंडेशन, पांगरे यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना मदतीचा आधार देण्यात आला.

तालुक्यातील बोरगाव, पोटेगाव आणि निलज या गावांना पुराचा मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे जीवनमान विस्कळीत झालेल्या कुटुंबांना फाउंडेशनच्या वतीने वस्त्रे, बिस्किटे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.

संकटकाळातील सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या मदतीबद्दल फाउंडेशनचे ग्रामस्थांनी आभार मानले. “आपलाच एक शेतकरी बांधव संकटात असताना त्याला आधार देणे हे आपले कर्तव्य आहे,” अशी भावना फाउंडेशनचे भैरवनाथ शिवाजी टेकाळे यांनी यावेळी व्यक्त केली. अमरजीत साळुंखे यांच्या माध्यमातून फाउंडेशनने पूरग्रस्त ग्रामस्थांना मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!