यशवंतराव चव्हाण महाविद्यालयच्या वतीने २९ जानेवारीला श्रमसंस्कार शिबीर – विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत कोर्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या शिबीराचे उद्घाटन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव विलासराव घुमरे व प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड उपस्थित राहणार आहेत.
या शिबीराच्या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद , जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे , उपकार्यकारी अधिकारी अमोल जाधव , जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार , उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर, शिक्षण उपसंचालक पुणे राजेंद्र अहिरे, सहाय्यक शिक्षण संचालक ज्योती परिहार , राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र राज्य समन्वयक प्रसाद कालगावकर, महाराष्ट्र गोवा राज्याचे समन्वयक अजय शिंदे , वित्त लेखाधिकारी दयानंद कोकरे, पुणे विभागीय समन्वयक पोपट सांभारे, नाम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक बाळासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबीर कालावधीत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफ- ण्यासाठी संचालक नेटाफेम लि. चे अरुण देशमुख ‘आधुनिक शेती, माती आणि पाण्याचे तंत्रज्ञान’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. फुलचंद नागटिळक ‘मी गाडगे महाराज बोलतोय… ‘या विषयावर प्रबोधन करणार आहेत.
तिसरे पुष्प गुंफण्यासाठी आदर्श शेतकरी बाळासाहेब काळे यांचे ‘आधुनिक शेतीचे तंत्र ‘या विषयी माहिती देणार आहेत. प्रवचनकार ह.भ.प. डॉ.जयंत करंदीकर यांचे ‘अध्यात्माकडून विज्ञानाकडे वाटचाल ‘याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भारुड सम्राट अनिल केंगार भारुडाच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत. चौथे पुष्प गुंफण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख महाराष्ट्र राज्य मंगेश चिवटे यांच्या शुभहस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. तसेच माजी प्राचार्य सुधीर इंगळे ‘ स्मार्ट व्हिलेज संकल्पना’याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. पाचवे पुष्प गुंफण्यासाठी संपादक दैनिक सकाळचे अभय दिवाणजी महिला बचत गटाला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महामाहिम राष्ट्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर केलेले दत्तात्रय येडवे व संजय बीदरकर यांचे ‘डोळे असून आंधळे कसे ‘या विषयावर प्रबोधन पर विनोदी व्याख्यान होणार आहे. सहाव्या दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक करमाळा विनोद घुगे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सातव्या दिवशी या शिबीराचा सांगता समारंभ गटविकास अधिकारी देवा सारंगकर, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमासाठी कृषी अधिकारी संजय वाळके, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे- पाटील, माजी उपसभापती प्रभाकर शेरे, माजी सभापती प्रा. संजय जाधव, राशींनचे उद्योजक मेघराज बजाज , जिल्हा अध्यक्ष शिवसेना शिंदेगट महेशजी चिवटे , नवी मुंबई बाजार समितीचे सचिव डॉ.पी.एल. खंडागळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शेरे, डि.सी.सी. बँकेचे माजी संचालक भरतरीनाथ अभंग हे उपस्थित राहणार आहेत. तसेच गावातील सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद, कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी कुस्करवाडी, हवालदारवस्ती अंगणवाडी बालवाडीच्या सेविका, गावकामगार तलाठी, पोलिसपाटील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य व कोर्टी गावचे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील वीट, मोरवड, राजुरी, सावडी, कुंभारगाव, पारेवाडी, पोंधवडी व हिंगणी येथील सर्व ग्रामस्थ यांना उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
या शिबीरात स्वच्छता अभियान , जलसंधारण, जनावरांचे लसीकरण , वृक्षारोपण, आरोग्य शिबिर , महिला मेळावा व विधवांचा सन्मान , ग्रामसर्व्हे , सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे स्तुत्य व नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये सर्व ग्रामस्थांना सक्रिय सहभागी होण्याचे आव्हान नूतन सरपंच भाग्यश्री मेहेर यांनी केले आहे.

