उजनीच्या काठावर स्वातंत्र्यदिनानिमित्त सृजनांचा मेळावा संपन्न


करमाळा(दि.१६): करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत सृजनांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मेळावा उजनी धरणाच्या काठावर ढोकरी (ता. करमाळा) येथील बंडगर वस्तीवर पार पडला. पाच तास रंगलेल्या या वैचारिक व सांस्कृतिक सोहळ्यात वैचारिक भाषणाबरोबरच कविता, भारुड, भावगीते, भक्तिगीते तसेच जुन्या चित्रपटातील सदाबहार गीते सादर होत राहिली. कार्यक्रमाच्या शेवटी तालुक्याच्या विकासासाठी गटपक्ष भेद विसरून सामाजिक बांधिलकीने एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

हा मेळावा ग्राम सुधार समिती करमाळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी निमंत्रित केला होता. दैनंदिन जीवनातील धकाधकीत माणसाला छंद जोपासता यावेत, संवाद साधता यावा यासाठी हा मेळावा घेण्यात आला असल्याचे डॉ. हिरडे यांनी सांगितले.


कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक लक्ष्मण लष्कर यांच्या स्वागतगीताने झाली. यानंतर जेष्ठ कवी प्रकाश लावंड, नवनाथ खरात, खलील शेख, विवेक पात्रुडकर, नितीन तकिक यांनी बहारदार कविता सादर केल्या. माजी प्राचार्य नागेश माने यांनी सुमधुर बासरीवादन, सेवानिवृत्त अधिकारी राजेंद्र रणसिग यांनी भारुड, तर काही कलाकारांनी भावगीते व भक्तिगीते सादर करून कार्यक्रम रंगवला.

शेती क्षेत्राची सद्यस्थिती, बलस्थाने व आव्हाने याबाबत आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील हनुमंत यादव यांनी मार्गदर्शन केले. तर माजी संचालक उदयसिंह मोरे पाटील व शहाजीराव देशमुख यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सर्व क्षेत्रातील मंडळींनी एकत्र यावे, अशी भावना व्यक्त केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अनिल माने यांनी चळवळीच्या गीतातून समाजातील वास्तव मांडले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे व गंगाराम वाघमोडे यांनी शैक्षणिक बदलांवर विचार मांडले.
यावेळी शिवाजीराव बंडगर यांनी उजनी धरणाची सद्यस्थिती, धरणग्रस्तांच्या समस्या व त्यावर उपाययोजना यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज अधोरेखित केली. समारोपात डॉ. बाबुराव हिरडे यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही तालुक्यातील सामान्य जनतेची होत असलेली मुस्कटदाबी लक्षात घेऊन याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहन केले.

यावेळी वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके यांनी वांगी परिसरातील समस्यांबाबत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. संदीप यादव यांनी सेंद्रिय शेतीसह विमुक्त अन्नाचे महत्त्व विषद केले. याच बरोबर भारतराव साळुंके, मंगेश जगताप यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार अर्जुन आबा तकिक यांनी मानले. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये सचिन पिसाळ, गणेश तळेकर, युवराज रोकडे, दत्तात्रय देशमुख, श्रीमंत चौधरी, भारतराव साळुंके, नाथाजीराव शिंदे,अंगद देवकते,मोरेश्वर पवार, रामलिंग बोधे, ॲड. संकेत खाटेर, शिक्षक दुधे, विलासराव लबडे, प्रशांत नाईकनवरे, नानासाहेब साळुंके, विजय लबडे,

याचबरोबर बाळासाहेब टकले ,अंगद देवकते, ढोकरीचे सरपंच दत्ता खरात ,माजी सरपंच किरण बोरकर ,भारत सलगर , देवीदास पाटील, महादेव वाघमोडे, भिवरवाडीचे सरपंच भाऊसाहेब शेळके,भजन सम्राट अंगद सांगवे,माजी उपसरपंच कुंडलीक गडदे ,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खरात , अनिल आरकिले , तात्यासाहेब सरडे,भागवत पाटील, काका पाटील, बालाजी मंगवडे,पांडुरंग गडदे,आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम बंडगर, आदित्य बंडगर, महादेव बंडगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप वाघमोडे, साईनाथ बोरकर ,माऊली सलगर , अर्जुन चौगुले ,अमोल गडदे ,प्रताप आरकिले ,संजय सांगवे ,बाबासाहेब चौगुले आदिनी प्रयत्न केला.

