मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘महारक्तदान अभियान’ – करमाळ्यातून ३५७ रक्तदात्यांचा समावेश

करमाळा(दि.२५): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभरात ‘महारक्तदान अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून करमाळ्यात २२ जुलै रोजी भारतीय जनता पार्टी, करमाळा शहर मंडलाच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ३५७ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.


शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, बाळासाहेब कुंभार, सुर्यकांत पाटील, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, आजिनाथ सुरवसे, अमोल पवार, दादासाहेब देवकर, बंडू शिंदे, सोमनाथ घाडगे, लक्ष्मण शेंडगे, राजू सय्यद, हर्षल शिंगाडे, प्रकाश ननवरे, संजय जमदाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




