गणरायाच्या विसर्जनावर जामा मशिदीतून पुष्पवृष्टी – ४० वर्षांची परंपरा कायम

करमाळा : करमाळ्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. शहरातील सर्व गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीवर वेताळ पेठेतील जामा मशिदीतून यंदाही पुष्पवृष्टीचा वर्षाव करण्यात आला. गेली तब्बल ४० वर्षे अखंड सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साह, श्रद्धा आणि बंधुभावाने साजरी झाली.

यावेळी मानाच्या पहिल्या राजेरावरंभा तरुण मंडळाच्या मिरवणुकीचे स्वागत करमाळा पोलीस स्टेशनच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या हस्ते राजेरावरंभा तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रतीक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिसांनी

या प्रथाबाबत माहिती देताना जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जमीर सय्यद यांनी सांगितले की, ही परंपरा करमाळा येथील स्व. सय्यद भाई (पत्रकार), स्व. हुसेनसाहेब अंडेवाले, स्व. गुलाम हुसेन शेख, स्व. गनीसाहेब अंडेवाले आणि स्वातंत्र्यसैनिक बाबू हमजेखान वस्ताद यांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज यांचा सहभाग आहे.

या पुष्पवृष्टीच्या उपक्रमासाठी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जमीर सय्यद, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक समीर शेख, सचिव रमजान बेग, सचिव सुरज शेख, हाजी उस्मान सय्यद, माजी नगरसेवक फारुक जमादार, रोहित पवार फाऊंडेशन चे अध्यक्ष मुस्तकीम पठाण, जहाँगीर बेग, इकबाल शेख, जावेद सय्यद, अलिम खान, अरबाज बेग, शाहीद बेग, आरिफ खान, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, चाँद बेग, यासिन सय्यद, ईमत्याज पठाण,कय्युम मदारी, दाऊद मदारी, अक्रम मदारी आदी जणांनी मेहनत घेतली.
करमाळ्यात कलाम फाउंडेशनचे उपक्रम ठरले प्रेरणादायी
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या माध्यमातून जमीर सय्यद, समीर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. करमाळा शहरातील वेताळ पेठेतील राम मंदिर येथे फाउंडेशनतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे, थंड पाण्याची सोय, शालेय साहित्य वाटप, अन्नदान यांसह अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

