अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त वांगी-३ मधील ३ महिलांना पुरस्कार देऊन केला सन्मान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्ताने आज करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक ३ ग्रामपंचायत च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये निता सोमनाथ खराडे, कल्याणी संजय सोनवणे आणि स्वाती सचिन कळसाईत यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्या सौ. रोहिणी सोमनाथ रोकडे आणि पुरस्काराच्या मानकरी सौ. निता सोमनाथ खराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक सचिन सरडे यांनी केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ रोकडे आणि सोमनाथ खराडे यांनी आपल्या भाषणातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा संपूर्ण इतिहासच उलगडून सांगितला. तर आभार डॉ. विक्रम बेद्रे यांनी मानले.
यावेळी वांगी नंबर ३ गावातील सुशिक्षित महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.या कार्यक्रमासाठी वांगी नंबर ३ गावचे प्रथम नागरिक सरपंच मयूर रोकडे, उपसरपंच संतोष कांबळे, राहुल रोकडे, सौ.कावरे, सुवर्णा बेंद्रे, सौ.साळुंखे, सौ.चिवटे आदी अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.