आंबेडकर जयंतीनिमित्त उमरड येथे चार दिवस व्याख्यानमालेचा कार्यक्रम संपन्न - Saptahik Sandesh

आंबेडकर जयंतीनिमित्त उमरड येथे चार दिवस व्याख्यानमालेचा कार्यक्रम संपन्न

केम (संजय जाधव) : स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उमरड गावा मध्ये चार दिवस व्याख्यानमालेच्या माध्यमातून महा पुरुषांच्या विचारांचा जागर करीत साजरी करण्यात आली. उमरड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीने बहुजन संघर्ष सेना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उमरड येथे दि. ११,१२,१३ व १४ एप्रिल भीम मोहत्सव साजरा करण्यात आला. महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. सलग चार दिवस विविध प्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली होती. यात प्रा. संपत गारगोटे सर,प्रा. डॉ. चौधरी सर, प्रा.डॉ. श्रीमंत कोकाटे सर, प्रा. नंदकिशोर वलटे ,फोजमल पाखरे यांची व्याख्याने झाली.

श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी, कामगार, महिला, दलित, यांच्या साठी कायद्यात हक्क मिळवुन दिले शेतकऱ्यांना बिगर परतावा वर्षाला अनुदान मिळावे म्हणुन पहिला मोर्च्या बाबासाहेब आंबेडकरांनी काढला होता शेतकऱ्यांना शेती तोट्यात करावा लागते म्हणुन सरकारने बिगर परतावा अनुदान दिले पाहीजे अशी मागणी करणारे बाबासाहेब आंबेडकर पहिले नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नसून आखंड भारत देशाचे महापुरुष आहेत बाबासाहेब म्हणाले मी पहिला भारतीय शेवट भारतीय ही भूमिका सर्व जाती धर्मातिल लोकांनी जोपासली पाहीजे आपण जाती धर्मा पेक्षा आपल्या भारत देशाला महत्व दिले पाहीजे राष्ट्र हित महत्वाचे आहे जाती धर्मातील अंतर कमी करून माणुसकी धर्म जपला पाहीजे.

सदर व्याख्यान मालेला उमरड परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. चार दिवस व्याख्यान व १४ एप्रिल दिवशी संध्याकाळी गावातून भव्य मिरववणूक काढण्यात आली. संपूर्ण जयंतीचा कार्यक्रम उमरड गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन यशस्वी पार पाडला.

सदर व्याख्यानमालेस मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन काळे,संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नितीन खटके,हँडबॉल असोसिएन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद गरड, अंजनडोह चे सरपंच अरुण शेळके,माजी सरपंच शहाजी माने,डॉक्टर शेळके,पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे,हनुमंत खरात, शेखर गाडे, राजुरी चे सरपंच डॉक्टर दुरंदे,आबासाहेब टापरे,साखरे सर,वाशिंबेचे झोळ सर, झरेचे सरपंच मोरे,सरपंच बाबासाहेब सरोदे,भीमराव घाडगे,इंजिनीयर घाडगे,कुंभेजचे सरपंच संजय तोरमल, दिलीप पवळ कुंभेज ,भीम आर्मीचे उत्तरेश्वर कांबळे पोफळज ,वंचित बहुजन आघाडीचे साहेबराव वाघमारे करमाळा, ज्ञानदेव गायकवाड केडगाव,नितीन धेंडे शेटफळ, भाऊसाहेब मांढरे सोगाव, भीमा भोसले सोगाव,शाहीर शिवाजी कांबळे, सचिन कांबळे पोफळज श्रीमान चौधरी, निबंधक दत्ता बदे, माजी सरपंच बापू चोरमले,सत्यवान पाटील, भगवान बदे, सोसायटी सदस्य जनार्धन मारकड, संभाजी बदे,माजी सरपंच संदीप मारकड,माजी उपसरपंच गणेश चौधरी,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संजय कोठावळे, रसूल शेख, ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख,श्रीकांत मारकड, देविदास पाखरे मेजर,विकास बदे, ग्रामपंचायत सदस्य भागवत कदम आधी बहुसंख्य प्रतिष्ठित लोक उपस्थित होते.

सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष बापू कदम,खजिनदार लखन कदम,सचिव कैलास कदम,सदस्य राजू शिंदे,सदस्य विकास कदम,सदस्य आबा कदम,सदस्य सदा कदम आधी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!