महाशिवरात्री निमित्त भाजपा महिला आघाडीच्या वतीने महादेव मंदिर येथे फराळ वाटप
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने महादेव मंदिर किल्ला विभाग करमाळा येथे भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात आले, या फराळ वाटपाची सुरवात सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आली. करमाळा शहरातील पुरातन काळातील ऐतिहासिक अशा महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. रेणुका राऊत यांनी केले होते, यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश आगरवल,
शहर सरचिटणीस जितेश कटारिया, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे , महिला आघाडीच्या ढोके मॅडम व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते,