सोमवार निमित्त उत्तरेश्वर मंदिरात करण्यात आली फुलांची आरास

केम (संजय जाधव) – केम येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर मंदिरामध्ये सोमवार निमित्त शिवलिंगाची वेगवेगळया रूपात सजावट केली जाते. त्या प्रमाणे काल सोमवारी सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली होती.
ही सजावट दादासाहेब नवले व युवराज लांडगे यांच्या सहकार्याने पुजारी समाधान गुरव यांनी केली. काल वसूबारस असल्याने मंदिरात श्री च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हि सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. केमच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. सारिका कोरे यांनी व दादासाहेब नवले यांनी केलेल्या सजावटिचे कौतूक केले.




